Wednesday, August 4, 2021
spot_img
HomeMain-sliderशिरसोलीच्या तरुणाची आत्महत्या।

शिरसोलीच्या तरुणाची आत्महत्या।

जळगाव / शिरसोली येथील जगदीश प्रल्हाद पाटील (32,रा.भोद,ता.धरणगाव,ह.मु.शिरसोली) या तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.जगदीश पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील शिरसोली येथे पत्नी व मुलाबाळांसह वास्तव्यास होते मात्र पत्नी आठ दिवसांपासून माहेरी गेल्याने ते घरी एकटीच होते.सोमवारी रात्री राहत्या घरात साडीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

असलीतरी ही बाब मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकिला आली आहे.आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.मयत जगदीश पाटील यांच्या पश्चात पत्नी उज्ज्वला,मुलगी जानू,मुलगा राज,दोन भाऊ असा असा परीवार आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिनिधी/प्रदीप देशमुख जिल्हा जळगांव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love