Tuesday, June 15, 2021
spot_img
HomeMain-sliderशिरूर अनंतपाळ शहरातील प्रभाग 6 मध्ये पथदिवे दुरुस्ती अभावी अंधार,

शिरूर अनंतपाळ शहरातील प्रभाग 6 मध्ये पथदिवे दुरुस्ती अभावी अंधार,

नगरपंचायतला निवेदन देऊनही नगरपंचायत करीत आहे दुर्लक्ष,

जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ शहरात प्रभाग क्रमांक ६ मधील गेल्या 1 महिन्यापासून विद्युत पथदिवे बंद असल्याने  नागरिकांना संध्याकाळी घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.पथदिवे दुरुस्ती अभावी प्रभाग 6 मध्ये सर्वत्र अंधार पसरत आहे.प्रभाग 6 मधील काही नागरिकांचे घर हलाखीचे आहेत.व पावसाळा चालु असल्याने त्यांच्या घरात पाणी येत आहे.मात्र पथदिवे दुरुस्ती अभावी अंधार असल्यामुळे त्या सामान्य नागरिकांना घरात पाणी आले तरीही तसेच रात्र काढवे लागत आहे.यामुळे पांडुरंग म्हेत्रे यांनी अनेक वेळा नगरपंचायतला लेखी तक्रार देऊनही नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.पथदिवे दुरुस्ती अभावी प्रभाग क्र.6 मधील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.नगरपंचायतने लवकरात लवकर पथदिवे दुरूस्त नाही केले तर प्रभाग 6 मधील नागरिकांच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे लेखी निवेदन नगरपंचायतला पांडुरंग म्हेत्रे यांनी दि.11 मे रोजी असे निवेदन देले होते.मात्र निवेदन देऊन 1 महिना झाले तरीही नगरपंचायत याकडे लक्ष देत नसल्याने प्रभाग 6 मधील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे .

जिल्हा प्रतिनिधी : खदीर विटेकरलातुर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Spread the love