Thursday, August 5, 2021
spot_img
HomeEducationशैक्षणिक चालू सत्रातील विद्यार्थ्याची 50 टक्के फी कमी करा,अन्यथा आंदोलन करण्याचा युवासेनेचा...

शैक्षणिक चालू सत्रातील विद्यार्थ्याची 50 टक्के फी कमी करा,अन्यथा आंदोलन करण्याचा युवासेनेचा इशारा,

वरोरा,चंद्रपूर/चंद्रपूर जिल्ह्यात हजारो सरकारी व खाजगी शैक्षणिक संस्था असून,लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात.परंतु,पाल्याला शिकवून मोठे करण्याची पालकांची उमिद असतांना कोरोनाच्या महामारीत लाकडाऊन काळात छोटे-मोठे व्यवसाय देशोधडीला लागले त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य पालकांची आर्थिक परिस्थिती दैनिय झाली.

त्यामुळे शिक्षण संस्थानची वाढलेली अवाढव्य फी पालक देऊ शकत नसल्याने एकूण फी मधून 50 टक्के फी मध्ये शिक्षण संस्थानी घ्यावी.अन्यथा युवासेना विद्यार्थ्याना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करेल असा इशारा युवासेना उपजिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांनी उपविभागीय अधिकारी वरोरा यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात इंग्रजी माध्यम व इंग्रजी माध्यमांच्या हजारो शासकीय व खाजगी शिक्षण संस्था आहे.कोरोनाचे महामारीमुळे मागील दिड वर्षांपासून शिक्षणाचे तीन-तेरा वाजले असून,विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास थांबला आहे.

सध्या आनलाइन अभ्यासक्रम सुरू असून,गोरगरीब व सर्वसामान्य विद्यार्थ्याजवल हॅन्डराईत मोबाईल नसल्यामुळे आनलाइन शिक्षण प्रणालीपासून बरेचशा विद्यार्थ्याना वंचित राहावे लागत आहे.परंतु,शिक्षण संस्था प्रशासन मात्र आकारलेली वर्गनिहाय प्रवेश फी दिल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

काही पालकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह व आपल्या पाल्यांचे शिक्षण घेण्यासाठी जे छोटे-मोठे व्यवसाय एक माध्यम होते ते सुद्धा कोरोना महामारीने हिसकावून नेले.आणि पालक आर्थिक अडचणीत सापडले.आपला मुलगा शिकून मोठा होईल आणि भविष्यात काहीतरी बनून आमचा आधार होणार असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पालकांसमोर शाळांची वाढलेली भरमसाट फी मुळे पालकांना मात्र भुरळ आली असल्याचे दिसून येत आहे.

शाळेची वाढलेली फी पालक भरू शकत नसल्यामुळे आपला पाल्य शिक्षणापासून वंचित तर राहणार नाही अशी भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे नामांकित शिक्षण संस्था असून शिक्षण पद्धती चांगल्या दर्जाची असल्यामुळे विद्यार्थ्याचा शिक्षण घेण्याचा कल हा नेमका याच शिक्षण संस्थाकडे असून मात्र भरमसाठ वाढलेल्या फी मुळे गरिबांचा मुलगा हुशार असून शिक्षण घेऊ शकत नाही.विद्यार्थ्याच्या शिक्षणात भरमसाठ फी ही एक आडकाठी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दूध असून,शिक्षणाशिवाय युवकांना तरणोपाय नाही.त्यांना आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षण घेणे हाच एक उपाय आहे.तरी शैक्षणिक संस्थानी आकारणी केलेल्या एकूण फी मधून 50 टक्के फी कमी करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करून देऊन एक दिलासा द्यावा.

जिल्ह्यातील शिक्षण संस्थानी सामाजिक दायित्व जोपासून व विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन 50 टक्के फी कमी करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी वरोरा सुभाष शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आलेला आहे.

युवासेना राज्य सचिव वरूनजी देसाई,युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश दादा कदम,जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी,युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळेस निवेदन देतांना युवासेना उपजिल्हाप्रमुख आलेख रट्टे,वरोरा तालुका संघटक शुभम टोरे,शहर प्रमुख राजुभाऊ बिरिया,युवा सैनिक मनीष नंदनवार,अंकित वासेकर,करण इंदुलकर,राहुल भालेराव रितीकेश मडावी,आर्यन हिवरे,आयुष मिलमिले आणि समस्त पालक उपस्थित होते.

प्रदीप कोहपरे-वरोरा प्रतिनिधी

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love