Wednesday, August 4, 2021
spot_img
HomeMain-sliderसत्तेच्या माध्यमातून समाजाभिमुख योजना राबविणे हेच वंचित आघाडीचे उद्दिष्ट्य-रेखाताई ठाकूर,पदाधिकारी आढावा सभा।

सत्तेच्या माध्यमातून समाजाभिमुख योजना राबविणे हेच वंचित आघाडीचे उद्दिष्ट्य-रेखाताई ठाकूर,पदाधिकारी आढावा सभा।

वाशिम/वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा 18 जुलै रविवारला स्थानिक विठ्ठलवाडी सभागृहात संपन्न झाला. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटनात्मक कार्यात येणाऱ्या समस्या जाणून घेऊन पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर,राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी,महासचिव महिला आघाडी डॉ अरुंधती शिरसाठ यांनी विदर्भाच्या दौऱ्याला 17 जुलै पासून सुरुवात केली.

वाशिम येथील कार्यकर्ता आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर,राज्यउपाध्यक्ष गोविंद दळवी,महासचिव महिला आघाडी डॉ अरुंधती शिरसाठ,राज्य कार्यकारिणी सदस्या किरणताई गिर्हे,जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख,जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे,जिल्हा सल्लागार डॉ सिद्धार्थ देवळे,जिल्हा महिला अध्यक्षा प्रमिलताई शेवाळे,नगराध्यक्षा मंगरुळपिर डॉ गजाला खान,नगराध्यक्ष कारंजा शेषराव ढोके संगीताताई मुंढे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी केले.जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा देऊन जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील तपशील सादर केला.जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीने केलेली आंदोलने आणि जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीकडे येणाऱ्यांचा ओढा वाढला असल्याचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी प्रास्ताविकात सांगितले व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा आशावाद व्यक्त केला.

प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या ध्येय धोरणाचा सर्वसामान्य वंचित घटकाला  उपयोग होण्यासाठी सत्ता मिळविणे महत्वाचे आहे.सत्ता मिळवून सत्तेच्या माध्यमातून समाजाभिमुख योजना राबविणे हे वंचित बहुजन आघाडीचे उद्दिष्ट आहे.आणि सत्ता मिळविण्यासाठी सक्षम संघटन असणे गरजेचे आहे तर संघटना ही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते म्हणून पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी पदाधिकारी आढावा बैठक महत्वपूर्ण असल्याचे मत प्रदेशाध्यक्षानी व्यक्त केले.

प्रसंगी राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनी तालुका अध्यक्ष,महासचिव,शहर अध्यक्ष,महासचिव यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन संघटन मजबूत होण्यासंदर्भात महत्वपूर्ण सूचना दिल्या.आढावा सभेचे सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ता प्रा सुभाष अंभोरे यांनी तर आभार जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे यांनी मानले.पदाधिकारी आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणी,तालुका कार्यकारिणी,युवा आघाडी कार्यकारिणी,महिला आघाडी कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

वाशिम/रवि अंभोरे

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Pooja Solanki on Idea and Concept of Change
Spread the love