Friday, September 24, 2021
spot_img
Homeनेशनलसमाज सेवेचे आत्मभान असलेला सेवावृत्ती नंदकिशोर बोगळे

समाज सेवेचे आत्मभान असलेला सेवावृत्ती नंदकिशोर बोगळे

प्रा.डॉ.बापूसाहेब काळबांडे.जगात अशी काही समाज सेवेचे आत्मभान असलेली माणस असतात,म्हणून समाज सेवा ही बाब त्यांचे आत्मभान असते.श्री नंदकिशोर बोगळे त्यापैकी एक होत.त्यांचे कथित जीवन म्हणजे सेवेत भरभरून वाहणारा प्रवाह होय.रूढ अर्थाने ते ३१ जुलै रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत.पण अशी मानस ज्यांनी जीवनभर सेवेचे वृत्त घेतले आहे ते भलेही सेवेतून निवृत्त होत असले तरी,समाज सेवा करणे त्यांच्या अंगभूत पिंड असल्यामुळे ते या सेवेतून कधीही मुक्त होऊ इच्छित नाहित.याबाबत समाजाने केलेला त्यांचा खरा गौरव आहे.

श्री.बोगळे हे M.Sc (Math) B.Ed आहेत.त्यांचे प्राथमिक शिक्षण औरंगाबाद व माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथे व व्यावसायिक शिक्षण (B.Ed) परभणी येथे झाले.त्यांनी अध्यापन सेवेचा प्रारंभ आश्रम शाळा फुटतलाव तांडा पालम येथून केला.पुढे वडगाव ( सुगरे ) ता.परभणी येथे काही महिने सेवा केली व त्यानंतर खरे स्थैर्य त्यांना इंदिरा गांधी विद्यालय पूर्णा येथे प्राप्त झाले व तेथूनच संस्थापक श्री.मोहन मोरे यांच्या संपर्कातून आणि प्रशासकीय कामात मिळालेले मार्गदर्शन यातूनच त्यांच्यात अंगभूत असलेला सेवाभाव यातूनच श्री.सोमेश्वर शिक्षण संस्था गौर या शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली व त्याद्वारे समाजसेवेचे ,शिक्षण प्रसाराचे अतिभव्य दालन त्यांनी अंगीकृत केले व गौर सारख्या ग्रामीण परिसरातील शिक्षणाची सेवावृत्ती दृष्टिने प्रसार केला व अनेक पिढ्या घडवल्या.

१९९३ मध्ये शाळा सुरु केली तरी हा प्रवास म्हणावा तेवढा सोपा नव्हता हा अवघड प्रवास काही जिगरबाज मित्र,सहकारी,गावकरी यांच्या सहकार्याने पार पाडला.या काळात पैसा फारसा उपलब्ध नव्हता पण मनोहर पारवे व इतर मित्र यांच्या सहभागातून हा शैक्षणिक प्रपंच पुढे मोठा वटवृक्ष झाला.पुढे १९९९ पासून इयता ५ वीचा वर्ग तर २००९-१० मध्ये ११ वी व १२ वी चे वर्ग सुरु करून ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षणाची सुविधा गौर सारख्या ग्रामीण भागात सुरु झाली याचे सर्वस्वी श्रेय हे प्राचार्य नंदकिशोर बोगळे व त्यांचे सहकारी मित्र या सर्वांचे आहे.

त्यातून गौर परिसरातील गोर गरीब,शेतकरी,शेतमजूर आणि ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना त्यांच्यातील शिक्षणाची भूक व विविध कला गुण विकासाला चालना देण्यासाठी शैक्षणिक दालन निर्माण झाले.आज या विद्यालयात ५ वी ते १२ वी पर्यंत ५५० ते ६०० विध्यार्थी शिक्षणाचा लाभ घेतात.व अनेक विध्यार्थी विविध शासकीय क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत आणि हे सर्व अधिकारी कर्मचारी उद्योजक या विद्यालयातील शैक्षणिक संस्काराचा वसा पुढे चालवत आहेत. हे शिक्षणाचे संकुल परिसराच्या भावी परिवर्तनाचे केंद्र झाले आहे आणि ही सर्व किमया या अवलिया गुरजीने विविध शैक्षणिक उपक्रम रात्रंदिवस मेहनत घेऊन निर्माण केली आहे.

श्री.बोगळे नंदकिशोर या संस्थेच्या संस्थापक सचिव व मुख्य प्रवर्तक तथा मुख्याध्यापक ते प्राचार्य अशा विविध भूमिका सहजपणे पेलत असाध्य शिक्षण विकास सहज साध्य केला.हा प्रवास जेवढा विहंगम तेवढाच खडतर आहे.सर्व संस्था सहकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सोबत व विश्वासात घेऊन हे शिक्षण व्रत अखंडपणे तेवत ठेवले.

सोमेश्वर शिक्षण संस्थेचा हा रथ अनेक अडचणीतून,आडथळ्यातून पुढे नेण्याचे कार्य या व्यक्तिमत्वाने न डगमगता सकारात्मक दृष्टीकोण ठेवून आजतागायत चालवण्यासाठी धडपड सुरु आहे असा हा एक या ग्रामीण भागातील ध्रुवतारा प्राचार्य या जबाबदारीतून आज मुक्त होत आहे मात्र या मुक्ती सोबत संस्था चालक,संस्था मुख्य प्रवर्तक शिक्षणाचा हा रथ पुढे ही समाजसेवेच्या आत्मभानाने सतत गतिमान ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलेला आहे.त्यांच्या या अशा विहंगम शैक्षणिक प्रवासात त्यांचा मोठा मित्र परिवार आहे.

आणि तो सुसंस्कारित व गुणवंत परिवार त्यांनी असीम प्रयतनाणी निर्माण केला तसेच त्यांच्या स्वतः च्या परिवारातील वडील श्री.भिमाशंकरआप्पा व आई सौ.शशिकलाबाई यांच्या संस्काराने उपकृत कार्य त्यांच्या हातून होत आले आहे.त्यांची पत्नी सौ.नलिनी व मुलगा विजय तसेच मुलगी डॉ.नेहा या सर्वांनी या अशा अवलिया,पायात भवरा असलेल्या वैरागी माणसाची साथ सावलीसारखी जपली त्यामुळे त्यांच्या हातून हा शिक्षणाचा रथ निर्माण होऊन गतिमान करण्याचा फार मोठा वाटा कुटुंबियाचा आहे.

मुलगा व मुलगी उच्चविध्याविभूषित असून मुलगी वैदकीय क्षेत्रात तर मुलगा शिक्षण क्षेत्रात त्यांच्या पावलावर पाऊल असे मार्गक्रमण करत आहे.असा हा कौटुंबिक परिवार व मित्र परिवार हीच त्यांची अपार श्रीमंती आहे.असे ते नेहमी त्यांच्या मनोगतातून व्यक्त करतात.ही त्यांनी कमवलेली श्रीमंती न संपणारी आहे.अशा या शहराकडून ग्रामीण भागाकडे विकासात्मक व सकारात्मक विचाराने व धेय्याने वेडा झालेला अवलिया एका उच्चभू पदावरून मुक्त होत आहे.त्यांच्या भविष्यातील वाटचालीस आणि मनोधैर्यास लक्ष लक्ष शुभेच्चा.त्यांचे व त्यांच्या कुटुंबियाचे जीवन आनंदीमय व आरोग्यदायी राहावे हीच श्रीचरणी प्रार्थना.

डॉ.बापूसाहेब काळबांडे.

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love