Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderसावधान!लातूर शहरात डेंग्यू आजार बळावतोय...महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

सावधान!लातूर शहरात डेंग्यू आजार बळावतोय…महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

लातूर/लातूर शहरातील घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढतच असून याकडे महानगरपालिकेचे कर्मचारी दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे,मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी साचून आल्याचे दिसत होते,शहरातील पोलीस अधीक्षक कार्यलयातील गाड्या तर चक्क पाण्यातच अडकून पडल्या होत्या,परंतु लातूर महानगरपालिकेचे कर्मचारी चक्क दुर्लक्ष्य करीत असल्याचे दिसत होते.फक्त साफसफाईचे फोटो सेशन करून पालिका कर्मचारी नालेसफाईकडे हाथ सुद्धा लावत नसल्याचे वास्तविकता आहे.

पण याकडे कोणीच लक्ष्य घालत नसून खुद्द पालिकेचे महापौरच सोशल मीडियावर दिवसरात्र स्वतः चा प्रचार करण्यातच मग्न असतात तर बाकी पालिका कर्मचाऱ्यांना तर काय नावे ठेवावे असे लातुरकरांनी भावना व्यक्त केल्या.डेंग्यू हा साठलेल्या पाण्यावर तयार होणारा डास आहे.टेरेसवर,झाडाच्या कुंड्यांवर,पाणी साठवण्याचे ड्रम,हौद,रिकामे मडके,टायर अशा ठिकाणी अनेक दिवस पाणी साचून असेल तर त्यात डेंग्यूच्या डासाची वाढ होते.सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात पाणी साठू देऊ नये.

तसेच आपल्या कॉलनीमध्ये सार्वजनिक ठिकाणी पाणी साचत असल्यास प्रभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांशी किंवा पालिका कार्यालयात कार्यालयात संपर्क साधावा आणि पाठपुरावा करावा कारण महानगरपालिका आपल्याकडून स्वछतेचा नावाखाली भरमसाठ कर आकारणी करीत असते त्याचप्रमाणे एक सुजाण लातुरकर म्हणून आपण सुद्धा आपल्या प्रभागातील घाणीच्या साम्राज्यबद्दल व तसेच नालेसफाईच्या कामाबद्दल पालिकेला वेळीच जाब विचारणे आपलेच कर्त्याव्य आहे.

प्रतिनिधी : खदीर विटेकर

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love