Friday, September 24, 2021
spot_img
HomeMain-sliderसोने विकून व्यापाऱ्यांना गंडावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे

सोने विकून व्यापाऱ्यांना गंडावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे

धुळे / गरज असल्याचे सांगत मदतीचा हात म्हणून बनावट सोने विकून व्यापाऱ्यांना गंडावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावत ६ लाख ६७ हजारांचा मुद्देमालासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील व्यापाऱ्याची फसवणूक झाल्यानंतर हा प्रकार समोर येताच एलसीबीने तपासाची चक्र फिरवली.

पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने शहरालगत असलेल्या साक्री रोडवरील भंडारा हॉटेलच्या पाठीमागे रस्त्यावर पाल टाकून राहणारे राजस्थान येथील दोघांच्या मुसक्या आवळल्या.संशयितांनी गुन्ह्यांची कबुली देत धुळे नाशिकसह लुबाडलेले ६ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल काढून दिला.संबंधितांकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

प्रदीप देशमुख जिल्हा जळगांव प्रतिनिधी

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Spread the love