Sunday, August 1, 2021
spot_img
HomeMain-sliderहेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा,जिंतूर मध्ये एकादशी निमित्ताने वारकरी...

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा,जिंतूर मध्ये एकादशी निमित्ताने वारकरी सांगतात अनुभव।

जिंतूर / यंदा महामारी ने पंढरपूरला पायी वारीत जाऊ शकलो नाही याचे दुःख मनात असले तरी सर्व पालख्यांचे दर्शन घरी बसूनच प्रसारमाध्यमांद्वारे घेतले परंतु पायी वारीचा आनंद आगळा वेगळा असतो व “माऊली” या नावाने सर्व वारक-याना हाक दिली जाते.व सर्व वारकरी मुक्त छंदाने आनंद घेऊन समाधानी होतात,त्यामुळे वारी चुकली तरी वारकऱ्यांना पुन्हा सुखाचे दिवस येऊ दे एवढीच अपेक्षा प्रा.डॉ.प्रभाकर वजीर गणपुरकर यांनी व्यक्त केली.

सदरील कार्यक्रम बलसा रोडवरील संतोषी माता मंदिर परिसरात संपन्न झाला.आपला वारीचा अनुभव व्यक्त करताना ते म्हणाले की वारीमध्ये दैनंदिन कार्यक्रम सुरू असतात.त्यात भजन कीर्तन भारुडे यांचा समावेश होता.रस्त्यात प्रत्येक गावातून स्वागत,नाष्टा,जेवण रस्त्यावरील मंडळी आनंदाने देत.पायी चालताना ही प्रत्येक वारकऱ्याला माऊली नावाने हाक देऊनच प्रवास होत असे.

रात्री प्रत्येक दिंडीचे मुक्काम ठरलेले होते त्यात पहाटेपासून दिंनक्रम अध्यात्मिक होता.टैंकर च्या पाण्याने स्नान केले तरी चमत्कार थंडी वाजत नव्हती.रहाटी मध्ये कोणतीही साफसफाई नसली तरी वारकऱ्यांना वारकऱ्यांसोबत आनंदाने राहण्याचा योग आल्यामुळे देहभान विसरून भजनात तल्लीन होऊन आनंद वेगळाच होता,कारण सर्वांच्या तोंडी एकच भाव होता तो म्हणजे “अनंत जन्मीचे विसरलो दुःख,पाहता तुझे मुख पांडुरंगा”.

वारकरी सुद्धा एकच मागणी करत करतात ती म्हणजे “हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा” मी पायी वारीच्या अनुभवातून एवढेच सांगेन की देवा आम्हा सर्व वारकरी व जनतेवर संत माऊलींचे कृपा सर्वांवर राहू दे हीच अपेक्षा.आषाढी एकादशी कार्यक्रमास प्रा.संदीप वजीर,प्रा.अनिल गणपुरकर प्रा.डॉ.प्रभाकर वजीर,दत्तात्रय गिते,बाळासाहेब चिरंगे,शरद गिरी,सुधाकरराव कुकडे आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी- सचिन रायपत्रीवार

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love