Daily Khabar

आपकी आवाज़, आपकी खबर

वंचित चा राजकीय धमाका, ग्रामपंचायत सरपंचपदासाठी फॉरेन रिटर्न, डॉक्टरेट, आदिवासी महिलेला उमेदवारी.

Spread the love

महाराष्ट्रात राजकीय चमत्कार आणि वंचित समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत एड बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखालील वंचित बहूजन आघाडीने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचे आदेश जारी केले.किमान सातवी पास अशी सदस्य सरपंच पदासाठी शासकीय अट असताना वंचित बहूजन आघाडीने राज्याच्या सारीपाटावर पुन्हा एकदा राजकीय चमत्कार घडविला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावात वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे नऊ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे करण्यात आले आहे.त्यामध्ये वार्ड क्रमांक २ आणि ३ मधून डॉ चित्रा अनिल कुऱ्हे ह्यांना उमेदवारी दिली आहे.डॉ चित्रा ह्या पॉलिटिकल सायन्स मधून “पीएचडी” असून त्यांनी स्वीडनमध्ये डॉक्टरेट केली आहे.विशेष म्हणजे त्या आदिवासी समाजातील आहेत.डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे हे दांपत्य ८ वर्षे विदेशात होते.त्यांनी स्वीडन सह जपान आदि देशात वास्तव केले आहे.डॉ चित्रा ह्यांना पाच भाषा अवगत आहेत.असे असले तरी ह्या दाम्पत्याने आपल्या मातीतील नाळ कायम घट्ट ठेवली आहे.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित हा त्यांचा श्रद्धा आणि विश्वासाचा विषय आहे.आणि म्हणून त्यांनी बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे विचाराने प्रभावित होऊन दिग्रसवाणी ही देशातील आदर्श आणि वंचित बहूजन आघाडीचा पॅटर्न ठरावी असा चंग बांधून आपल्या उच्च विध्याविभूषित पत्नीला ग्रामपंचायत साठी उभे केले आहे.सोबतच सुभाष खंदारे, सुनीता खंदारे, मिना वसेकर, अनिता आढळकर, उज्वला नायकवाल,साळूबाई पाईकराव, हिम्मत खंदारे असे सर्वसमावेशक पॅनल उभे केले आहे.
सरपंचपदाची निवडणूक थेट होत नसली तरी वंचितच्या ग्राम विकास आघाडीने डॉ चित्रा कुऱ्हे ह्यांना सरपंच पदाचा उमेदवार जाहीर करूनच प्रचार सुरू केला आहे.
हे करताना त्यांनी “वंचितांचा वचनानामा” प्रकाशित करून गावच्या विकासाचा रोडमॅप ग्रामस्थान पुढे मांडला आहे.भ्रष्ट्राचार मुक्त ग्रामपंचायत, दारु मुक्त आणि डिजिटल ग्रामपंचायत, सौरऊर्जेचा वापर, मुबलक व स्वच्छ पाणी, आरोग्य, दिवाबत्ती, महिला आरोग्य आणि रोजगार अश्या अनेक मुद्यांना घेऊन राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे संकल्पना असलेल्या ग्रामविकासाची मांडणी केली आहे. प्रचारात देखील विरोधात उभे असलेल्या उमेदवार किंवा पॅनल बद्दल टिका न करता वंचित विकासाचा अजेंडा मांडला जातो.दारू, मटन, पैसा पार्टि हा प्रकार कुठेही नाही.
नाही म्हणायला निवडणूक गावातील जाहीर होताच प्रस्थापित राजकीय मंडळींनी आपली मक्तेदारी आणि घराणेशाही म्हणून बौद्ध समूहाला बायकॉट करीत “आम्हाला त्यांची गरज नाही” ही भाषा वापरली होती.त्यामुळे गावातील वंचितचे कार्यकर्ते ह्यांनी पक्षाच्या ग्रामपंचायत निवडणूक लढण्याच्या आदेशाचा धागा धरून ह्या प्रस्थापित ‘खांग्रेसी’ राजकीय वळूंना वठणीवर आणायचा चंग बांधला.सिद्धार्थ खंदारे, रामदास खंदारे, गौतम खंदारे, भास्कर कुटे, विश्वनाथअप्पा साढळकर, शिवप्पा आढळकर, किसनाप्पा जिरवनकर, भारत जिरवनकर (बिल्डर), सुभाष खंदारे, शिवाशांत आढळकर,मनोहर कांबळे, सखाराम खंदारे, राजू वाघमारे, सुनील खंदारे, राहुल खंदारे, सखाराम कांबळे, बबन कांबळे, प्रकाश धबडगे सिद्बोधन खंदारे ह्यानी सर्व वंचित समूहाला एकत्र केले.त्यासाठी डॉ अनिल कुऱ्हे आणि डॉ चित्रा कुऱ्हे ह्यांना गळ घालून गावातील विकासासाठी पुढे आणले. कुऱ्हे दाम्पत्य हे बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे कार्याने प्रभावीत होतेच.त्यांनी लागोलाग हा प्रस्ताव मान्य करून वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनलद्वारे नऊ उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनल उभे केले.हिंगोली जिल्हा पदाधिकारी बोलवून रितसर प्रचाराचे नारळ फोडून घेतले.
हिंगोली जिल्ह्यातील दिग्रसवाणी ह्या गावातील वंचित बहूजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनल मध्ये आठ वर्षे जगातील विविध देशात राहिलेल्या फॉरेन रिटर्न, डॉक्टरेट (पोलिटिकल सायन्स मध्ये पीएचडी) असलेल्या आदिवासी समूहाच्या डॉ चित्राताई अनिल कु-हे ह्या सरपंच पदासाठी घोषित करून नऊ जणांचे सर्वसमावेशक पॅनेल उभे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाच्या पीएचडी धारक, फॉरेन रिटर्न महिला ग्रामपंचायत सरपंच पदासाठी देण्याचा विक्रम वंचित बहूजन आघाडीने केला असून काल दिग्रसवाणी ह्या गावी वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करायची आहे, त्यामुळे मी जाहीर सभेला आलेच पाहिजे असा आग्रह ग्रामस्थांनी आणि पॅनल प्रमुखांनी केल्याने काल दिनांक १२ जानेवारी रोजी जाहीर सभा करून आलो.

ह्यावेळी सोबत वंचित युवा प्रदेश पदाधिकारी तथा हिंगोली जिल्हा युवा निरीक्षक अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, महासचिव रविंद्र वाढे, माजी जिल्हाध्यक्ष वसीम देशमुख ह्यांची प्रमुख उपस्थिती होती.कालच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता ह्या पॅनल चा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहूजन आघाडीचा “नही भी होगी संख्या भारी फिर भी मिलेगी भागीदारी” हा मूलमंत्र आणि सरपंच पदासाठी इतकं कॅलिबर असलेला उमेदवार उभे करण्यात महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात हा नवा हिंगोली पॅटर्न कमाल करून दाखवणार ह्यात शंकाच नाही.

राजेंद्र पातोडे
प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव
वंचित बहूजन आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
9422160101