Daily Khabar

आपकी आवाज़, आपकी खबर

जिंतूर मध्ये मकरसंक्रांत मुळे बाजार फुलली,

Spread the love

जिंतूर, ता.१२ …….. (बातमीदार- सचिन रायपत्रीवार)मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.१२) शहरातील बाजारपेठ फुलली असून सणासाठी लागणाऱ्या वाणांच्या वस्तूंसह विविध साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी झाली झाली आहे.मंगळवार हा येथील आठवडी बाजारचा दिवस असल्याने त्यात उद्या भोगी असल्यामुळे गर्दीत भर पडली आहे.   महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण महत्त्वाचा समजला जातो.या दिवशी सुवासिनी नवीन वस्त्रालंकार परिधान करून छोट्या मातीच्या मडक्यांना (सुगडे) हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळून त्यामध्ये गाजर,बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगूळ, कच्ची खिचडी, इत्यादी वस्तू भरून कांही सुगडे देवापुढे, तुळसीपाशी ठेवून सवाष्णींना वाण-वसा देतात.व हळदीकुंकू करून एकमेकींना तिळगूळ वाटतात. हळदीकुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत चालतो.आबालवृद्ध नागरिकही तिळगुळ घ्या,गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ वाटून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात.  अशा या पावन सणानिमित्त बाजारात हळदीकुंकू, सुगडे, बिब्बा, हरभऱ्याचे डहाळे, वाळूक,तयार काटेतीळ यासह अनेक वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे.