जिंतूर/ सचिन रायपत्रीवार*
जिंतूर येथील गणपती गल्ली रोडवर श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण महा अभियान निधी संकलन कार्यालय जिंतूर येथे उद्घाटन संपन्न झाले.या मंगल प्रसंगी जिंतूर तालुक्यातील पूजनीय संत महंत मंडळी उपस्थित होती. सर्व संत महंतांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी सर्वश्री ह.भ.प. बंडू महाराज इटोलीकर , नरहरी महाराज भिलजकर, प्रसाद महाराज कदम बोर्डी. , अनंता महाराज सांगळे, राजू महाराज घुगे, रामकिशन महाराज दराडे, संदिपभाई शर्मा महाराज, शाम महाराज दरगड, विनायक महाराज टाक , नारायण महाराज पांगरीकर, भिकाजीराव बुधवंत आदी संताची उपस्थिती लाभली. तसेच जिंतूर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री ब्रीजगोपाल तोष्णीवाल, जिंतूर ता अध्यक्ष रमेशजी दरगड, एड. मनोज सारडा, एड. योगेश उन्हाळे महेंद्र डोईफोडे, दीपक देशमुख ,केदार सोनी ,स्वप्नील कडे, सागर चवंडके अमृत इटोलीकर ,पराग मोहरील किशोर यावतकर, भारत महाजन जितेंद्र ढेंगे शिवाजी सोमोसे पत्रकार विजय चोरडिया, सचिन रायपत्रीवर, गुलाबराव शिंदे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. या अभियानाचे प्रसिद्धी प्रमुख श्री प्रदीप कोकडवार व मंचकराव देशमुख तसेच जिंतूर तालुका अभियान प्रमुख मंगेश कुरे, कार्यालय प्रमुख बाळासाहेब ठोंबरे तथा निधी संकलन प्रमुख रविकुमार पेशकार हे काम पहात आहेत.हे अभियान जिंतूर तालुक्यात दि १५जानेवारी ते १५फेब्रुवारी दरम्यान हे महा अभियान राबवले जाणार असून या कार्यालय मार्फत तालुक्यातील सर्व नियोजन चालणार आहे अशी माहिती प्रखंड प्रमुख संदीपभाई शर्मा यांनी दिली आहे
Spread the love
More Stories
11वां राष्ट्रीय मतदाता दिवस आयोजित — नवीन मतदाताओं को आज से मिलेगी ई-इपिक की सुविधा,
मेडीकल कॉलेजसाठी मंगळवारी सर्वपक्षीय आंदोलन: खासदार जाधव,
आज भोगाव येथे कृषी महोत्सव सप्ताह निमित्त जनजागृती प्रमुख मार्गदर्शन आबासाहेब मोरे,