Spread the love

दि.16/03/23 बोरिवली मुंबई
  दि.14/03/2023 रोजी रात्री 9.15 ते 9.30  दरम्यान तक्रारदार पृथ्वीराज झाला हे स्वतः व्यवसायाने वकील असून त्यांच्या परिचयातील महिलेसोबत कांदिवली पोलीस ठाणे हद्दीत कार दुर्घटना घडल्या कारणास्तव त्या महिलेच्या बोलवण्यावरून तक्रारदार हे कांदिवली पोलीस ठाणे येथे पोहोचले होते.ठाणे अंमलदार कक्षात उपस्थित महिला अधिकाऱीने तक्रारदारास बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार थोड्या वेळा करता बाहेर थांबले.काही वेळाने कोणीतरी त्यांना आत बोलावले यासाठी ते ठाणे अंमलदार कक्षात गेले असता तेथे उपस्थित अजून काही तक्रारदारांन समक्ष तेथे उपस्थित पोलीस अधिकारी API हेमंत गीते यांनी पोलीस ठाण्यातच तक्रारदार पृथ्वीराज झाला यांच्यावर हात उगारून कानाखाली मारली.तक्रारदार पृथ्वीराज झाला यांनी मी वकील आहे असे सांगून सुद्धा त्या पोलिस अधिकाऱ्याने तक्रारदारास “तुला जेवढ्या वकिलांना घेऊन यायचे त्यांना घेऊन ये तुला वरती रिमांड रूममध्ये दाखवतो” असा दम भरला. त्यानंतर तक्रारदार पृथ्वीराज याने बोरिवली बार असोसिएशनच्या जॉईंट सेक्रेटरी दुबे यांना कॉल करून पोलीस ठाण्यात बोलवले.थोड्यावेळात अजून काही वकील पोलीस ठाण्यात  आल्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकरणाबद्दल वरिष्ठांची विचारणा केली तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
      त्यादरम्यान तिथे उपस्थित PSI विलास ठाकरे यांनी सुद्धा मध्ये बचाव करून प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला.तक्रारदारास तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये असल्या कारणास्तव हे सर्व घडले या अनुषंगाने नंतर प्रकरण सावरण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला.काही वेळाने कांदिवली पोलीस ठाण्याचे  सीनियर इन्स्पेक्टर दिनकर जाधव यांनी त्यांच्या केबिनमध्ये आलेल्या  वकीलांसोबत चर्चा केली.


      परंतु वकिल पृथ्वीराज झाला यांनी झालेल्या प्रकरणाबद्दल बोरिवली बार असोसिएशन यांच्याकडे झालेल्या प्रकरणाबद्दल रोष व्यक्त केला.त्या अनुषंगाने आज दिनांक 16/03/2023 रोजी सकाळपासूनच बोरिवली सत्र न्यायालय परिसरात सर्व वकिलांनी काळी फीत लावून एकत्र उपस्थित राहून  पोलिसांनी केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त केला आहे.काही अनुचित प्रकार न घडावा याकरिता त्याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा देण्यात आला होता.
    दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी बोरिवली बार असोसिएशनचे प्रेसिडेंट राजेश मोरे व जॉईंट सेक्रेटरी विपिन दुबे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत संबंधित दोषी अधिकाऱ्यावर F.I.R नोंद करण्याची मागणी केली आहे.तसेच बार असोसिएशनच्या वतीने वकीलांनसाठी प्रोटेक्शन कायदा महाराष्ट्रातसुद्धा लागू करून वकिलांना संरक्षण मिळण्यासाठी कायदा पारित होण्यासाठी हा मुद्दा उचलून धरणार असल्याचे सांगितले आहे.तक्रारदार पृथ्वीराज झाला यांच्यासोबत बोलताना त्यांनी डि.सी.पी झोन 11 तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना देखील लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्याचे सांगितले.
     सदर घटना ही गांभीर्याने घेत डीसीपी झोन 11 अजय कुमार बंसल यांच्या आदेशानुसार कांदिवली पोलीस ठाणे येथील API हेमंत गिते यांना कांदिवली पोलीस ठाण्यामधून झोन 11 कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.तसेच मालवणी विभागाचे एसीपी शैलेंद्र धिवर यांना 7 दिवसांत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल झोन 11 कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे.

Umesh Solanki

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *