Spread the love

दि.23/03/2013 गिरगाव,मुंबई
या निमित्ताने पुन्हा ख-या मुंबईची ओळख गिरगावात दिसली..

  गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून सकाळी 8 वाजल्यापासून शोभा यात्रेला सुरूवात झाली.साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथ हे या शोभा यात्रेतलं मुख्य आकर्षण होते.तसेच आर्य चाणक्य यांच्या हातात 22 फुटी गुढी या चित्ररथात साकारली. दरआज हिंदू नव वर्षाचे स्वागत शोभा यात्रेनं करण्यात आले. शोभा यात्रेत पुरुषांसह महिलांनी पारंपारिक वेष परिधान करत शोभा यात्रेत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची, मावळे यांची वेशभूषा करून इतिहास कालीन वातावरण निर्मिती करण्यात आली.अनेक मराठी कलाकारांनी यात्रेत सहभाग नोंदवला.

पारंपारिक वेषात महिलांची बाईक रॅली….

    महिलांनी पारंपारिक नथ, भरझरी नऊवारी साडी, हिरे, मोती आदी आभूषणे परिधान करत बाईक रॅली काढण्यात आली. महिलांची ही बाईक रॅली प्रामुख्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.यावेळी मुंबईच्या अनेक भागातून तरुणाई गिरगांवमध्ये शोभायात्रेत सहभागी झाले.
    दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा छायाचित्रकार मंगेश जाधव यांनी या शोभावती यात्रेतील अप्रतिम असे काही क्षण आपल्या कॅमेरामध्ये कैद केले.

छायाचित्रकार : मंगेश जाधव

Maharashtra Head : Vaibhav Raut

Umesh Solanki

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *