पूर्णा, प्रतिनिधी
गुरुराज माऊली चा अखंड जयघोष, सोबत असंख्य महिला मंडळींची फेर धरत पाऊली, सोबत श्रीगुरुबुध्दि स्वामींची प्रसन्न मुद्रा असलेली पालखी,त्यांनतर गुरु नुंजुंदेश्वर नंदिवर विराजमान व त्यामागे मठा धिपती नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज ह्यांचा आश्र्वरथ असा सगळा अनुभव काल रात्री पूर्णेकरणी याची देहा अनुभवला.
दरवर्षीप्रमाणे कोरोना कालखंड वगळता तोच जोश, तोच उल्ल्हास, आणि पंचक्रोशीतील सर्वधर्मीय बांधवांची मांदियाळी, काल पुनश्च एकवार पूर्णत पाहायला मिळाली, सकळी काल्याचे कीर्तन, त्यानंतर प्रसिद्ध खीर महाप्रसाद, रात्री टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक असा कार्यक्रम रात्री 4वाजेपर्यंत रंगला, सकळी मानकरी मंडळीच्या हस्ते श्रींच्या प्रतिमा पूर्ववत मठात स्थानापन्न करून आरती करण्यात आली आणि या उत्सवाची सांगता झाली, दरम्यान लोकप्रिय खासदार बंडू जाधव, जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनीही सर्वांसोबत पगतीमध्ये बसून महप्रसदचा लाभ घेतला*
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरु स्वामी पाडवा यात्रा महोत्सव समिती च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.