Spread the love

राजुरा :- ऐन वर्दळीच्या ठिकाणी काल रात्री ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान झालेल्या चाकू हल्ल्याने राजुरा शहर हादरले आहे .
काही दिवसापूर्वी भरदिवसा झालेल्या गोळीबारात सौ. पुर्वशा सचिन डोहे यांना आपले प्राण गमवावे लागले .या घटनेची शाई वाळते न वाळते तोच काल रात्री पूर्व वैमनस्यातून विक्रांत महेश रामटेके याचेवर चाकूने प्राणघातक करण्यात आला .
विक्रांत महेश रामटेके हे राजुरा येथील इंदिरा नगर येथे रहात असून ते आऊटडोअर फोटोग्राफीचा व्यवसाय करतात.
लग्न समारंभाच्या फोटो शूटिंगच्या ऑर्डर साठी मोबाईल कॉल करून हल्लेखोरांनी ट्रेंड्स मॉल जवळील श्री चायवाला दुकानाजवळ बोलाविले .तेथे उभा असलेल्या एकाने आपले नाव सांगत फोटो शूटिंगच्या खर्चाबाबत विचारणा केली .त्याच वेळेस आणखी दोघे तेथे आले .
विक्रांत खर्चाची रक्कम सांगून सोबत आलेल्या प्रणय नगराळे सोबत जायला निघाला तेव्हा विक्रंतला परत बोलावून त्याचे छातीवर जवळ असलेल्या चाकूने वार केला .अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरून विक्रांत.धावत ट्रेंड्स मॉल मध्ये शिरला .संधी साधून तीनही हल्लेखोर पळून गेलेत .
प्रणय नगराळे याने इतरांचे मदतीने विक्रांतला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले .तेथून विक्रंतला जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले .
सदर हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे .
हल्लेखोरांवर कलम ३०७/३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून परिविक्षाधीन पोलिस अधिकारी श्री.विशाल नागरगोजे ह्यांचे मार्गदर्शनात एपीआय धर्मेंद्र जोशी , पीएसआय वडतकर डीबी पथक,तपास अधिकारी नरेश उरकुडे पीएसआय ह्यांनी २४ तासाचे आत तीनही आरोपींना नागपूर येथे अटक करून राजुरा पोलीस स्टेशन येथे आणले .

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *