जावेद अली जी. प्र.गडचिरोली

अहेरी आलापल्ली हे 7 किमी अंतर असलेले शहर असून सुद्धा या अहेरी चेच राजे. महाराजे मंत्री असून सुद्धा अहेरी आलापल्ली रोड होत नसल्याने ये जा करणाऱ्या जनते मध्ये चीड निर्माण झाली आहे. मानवाधिका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर यांनी एका पत्रका द्वारे माहिती दिली आहे. मागील एक वर्षा पूर्वी मंजूर झालेले काम अद्याप का झाले नाही असे ही पत्रकात नमूद करण्यात आले आहे रोज या रस्त्यावर एक ना एक अपघात होत असतात.7 किमी अंतर ए जा करायला अर्धा तास लागतो. व तसेच अहेरी ते महागाव हे सुद्धा 7 किमी अंतर मंजूर झाले असून सुद्धा या कडे सुद्धा समंधित अधीकार्यांचा अजिबात लक्ष नाही. रोड वर पूर्ण खड्डे व गिट्टी पसरून असल्याने कधी दुचाकी घसरून अपघात होणार याचा नेम नाही. रोज या रस्त्यावर एक दा तरी अपघात होत असतो. मात्र जण प्रतिनिधी मात्र मूग गिडून गप्प बसले आहे. स्वतःत्रांचा अमृत महोत्सव मोट्या थाटामाठात साजरा केल्या जात आहे व या अहेरी विधानसभा क्षेत्रात मरण यातना भोगाव्या लागत आहे ही अवस्था सम्पूर्ण गडचिरोली जिल्याची झालेली बघायला मिडत आहे. करीता शासनाने योग्य तो उपाय योजना करून त्वरित रोड चे काम सुरु करावी अशी मागणी किशोर शंभरकर जिल्हा अध्यक्ष मानवाधिका संघटना गडचिरोली यांनी केली आहे.
