इतर राज्यांच्या तुलनेत अतिशय कमी मोबदला मिळत असल्याने समान काम समान दाम तत्त्वावर मोबदला देण्याच्या मागणीसाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनी संपूर्ण राज्यात 1 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अपघात व इतर संकटसमयी रुग्णसेवेसाठी १०८ क्रमांक डायल केल्यास तत्परतेने धावून येणाऱ्या रुग्णवाहिकेवर बीव्हीजी कंपनीकडून खासगी चालक नियुक्त केलेले आहेत. त्यांना बारा तास कामासाठी १५ ते १९ हजार रुपये मोबदला दरमहा मिळतो मात्र कर्नाटक, तमिळनाडू राज्यात ८ तासासाठी ३० हजार आणि १२ तास कामासाठी ३८ हजार मिळतात. या तफावतीबाबत राज्यातील सर्व रुग्णवाहिका चालकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केली समान काम समान दाम देण्याची त्यांची मागणी होती. याबाबत मंत्र्यांनी बीव्हीजी कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही बिविजी संघटना आणि महाराष्ट्र राज्य याबाबत काहीही निर्णय घेतला नाही आता एक महिना याबाबत काहीच निर्णय झाला नसल्याने राज्यातील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनी १ सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे होणाऱ्या रुग्णांच्या गैरसोईस बीव्हीजी कंपनी आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे संघटनेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
यासंदर्भात
सिव्हिल सर्जन साहेब चंद्रपुर, पुलिसअधीक्षक साहेब चंद्रपुर
तसेच
जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर
याना निवेदन देण्यात आले,
यावेळेस महाराष्ट्र रुग्नवाहिका 108 वाहनचालक संघटनेचे मुख्य प्रवक्ते श्री खुशाल पुंडलीकराव लकड़े, उमेशभाऊ येणावार, हरिशकुमार नवले, अमितभाऊ धोत्रे तसेंच नांदुभाऊ मगरे इत्यादी पायलट सोबत होते,
रुग्णवाहिका चालकास कमी मोबदल्यात काम करावे लागत असल्याने राज्य सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत खास निर्णय घ्यावा अशी आमची मागणी असून निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी. अन्यथा १ सप्टेंबर पासून काम बंद आंदोलन आणि बेमुदत उपोषणही करण्यात येईल
- तेजस कराळे,
अध्यक्ष, १०८ रुग्णवाहिका चालक संघटना महाराष्ट्र राज्य