अहेरी:- वारंवार सांगून व सूचना देऊनही उपविभागीय अधिकारी (राजस्व) येथील कर्मचारी कार्यालयीन वेळेत पोहचत नसल्याने सोमवार 28 आगष्ट रोजी नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी(भा.प्र.से.)वैभव वाघमारे यांनी उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या दालनाला सकाळी पाऊणे अकरा वाजताच्या सुमारास कुलुप ठोकले. त्यामुळे अन्य शासकीय कार्यालयात व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. उल्लेखनीय म्हणजे कार्यालयीन वेळेत ग़ैरहजर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग प्रसंगी निलंबनाची कारवाई करण्याचे संकेतही दिसत आहे.
उपविभागीय कार्यालयात स्वतः उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे पोहचुणही अन्य कर्मचारी कार्यालयीन वेळेत न पोहचल्यामुळे कर्मचारी यांच्या दालणाला सील ठोकले जेणेकरून या पुढे या कार्यालयातील व अन्य कार्यालयाला धड़ा शिकविण्यासाठी असा पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.
एसडीओ वैभव वाघमारे हे अती तत्पर व कर्तव्यदक्ष अधिकारी असून गोरगरिब जनतेचे कार्यालयीन कामे रेंगाळत ठेवणे व त्याच त्या कामासाठी गोर गरीब नागरिकांना खेटारे मारायला लावणे वाघमारे यांना मुळीच पसंद नसून त्यासाठी असा बडगा उगारला आहे.
कार्यालयीन वेळेत वेळेवर उपस्थित न होणे, दिरंगाई, कामचुकार, शिस्तभंग, निष्काळजीपणा, नागरिकांना कार्यालयीन कामासाठी ‘उद्या या, परवा या, नंतर बघू’ कर्मचाऱ्यांच्या अशा वाईट सवयी मोडित काढण्यासाठी आणि अन्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सदरचा ‘मैसेज’ देण्यासाठी दस्तुरखुद्द अधिकारीच स्वतःच्या कार्यालयातील कर्मचारी यांच्या दालणाला कुलुप ठोकुण अप्रत्यक्ष रित्या अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना ‘अलर्ट’ राहण्याचे दाखवून दिले आहे.
उपविभागीय कार्यालयातील कार्यालयीन वेळेत ग़ैरहजर राहणारे कर्मचारी यांच्यावर नेमकी कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
अहेरीत वैभव वाघमारे रुजू झाल्यापासून कामाचा धड़ाका!
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोबतच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून वैभव वाघमारे (भा.प्र.से)हे मागील महिन्यात अहेरीत रुजू झाले असून तेंव्हापासून कामाचा धड़ाका लावले आहे, पेंडिंग कामे अतीशीघ्र गतीने मार्गी लावत असून विविध ठिकाणी अकस्मात दौरे करुण कामाची तत्परता दाखवित आहेत.
विशेष व उल्लेखनीय म्हणजे नुकतेच कोतवाल भर्ती झाली. कोतवाल भर्तीसुद्धा एसडीएम वैभव वाघमारे यांनी स्वतः काळजीपूर्वक लक्ष देऊन अगदी पारदर्शकतेने परीक्षेची प्रक्रिया पूर्ण केले. त्यामुळे होतकरू व हुशार उमेदवारांना कोतवाल नोकर सेवेची संधी प्राप्त झाली आहे.
गडचिरोली से ब्यूरो चीफ ज्ञानेंद्र विश्वास