Spread the love

एटापल्ली येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्र ची शाखा सुरू होणार

एटापल्ली: एटापल्ली हे तालुका मुख्यालय असून मागील कित्येक वर्षांपासून एटापल्ली येथे स्टेट बँक ऑफ इंडिया ची शाखा सोडले तर तालुक्यातील इतर कुठल्याही गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नव्हती, दुर्गम अशिक्षित तालुका जरी असला तरी स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आज पर्यंत फक्त एका राष्ट्रीय कृत बँके वर भार होता पण आता सुरजागड लोह खदानीमुळे तालुक्यातील लोक संख्येत प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे बँकेत खाते धारकांची संख्या सुद्धा वाढली असून स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकारी आणि कर्मचारी यांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली होती, त्यांच्या अनेक तक्रारी होत्या, त्यामुळे तालुक्यातील जनतेला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत होता कारण शेतकऱ्यांच्या धानाचे पैसे,तेंदू पत्त्यांचे पैसे तसेच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती मना सगळे रक्कम आता थेट खात्यात जमा होत असल्याने दुर्गम भागातील जनतेला एटापल्ली येथे येऊन एकच बँक असल्याने व्यवहार करायला त्रास होत होता. याची तक्रार तालुक्यातील नागरिकांनी भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या लक्षात त्यांच्या जनसंपर्क दौऱ्यावर असताना आणून दिली, माजी आमदार आत्राम यांनी मागील 5 जूनला उप विभागीय कार्यालय एटापल्ली येथे विविध मागणी संदर्भात मोर्चा काढला होता त्यात या मागणीचा सुद्धा समावेश होता, एटापल्ली,कसनसुर व जारावंडी येथे राष्ट्रीयकृत बँकेची मागणी केली होती त्या मागणी ला यश आहे लवकरच एटापल्ली येथे नवीन शाखा सुरु होईल त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी समाधान आणि माजी आमदार दीपक आत्राम यांचे आभार व्यक्त केले आहे

गडचिरोली से ज्ञानेंद्र विश्वास

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *