Spread the love

Daily Khabar :

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा अति दुर्गम, डोगराड, नक्षलग्रस्त, आदिवासी अविकसित म्हणून ओळखलं जातो एटापल्ली तालुकायातील अति दुर्गम आदिवासी युवक -युवतीना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स,लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशनचं वतीने ऑस्ट्रेलिया ला माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी निवड झालेल्या १५ विद्यार्थ्यांना इंग्रजी सुरळीत बोलता याव यासाठी नागपुर येथे इंग्रजी स्पीकींग कोर्सचे शिक्षण घेण्याकरिता पाठविण्यात आले आहे. ह्या विद्यार्थ्यांचे नागपुरातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे त्यांना एडवांस कोर्स घेण्याकरिता दिल्ली ला पाठविण्यात येणार आहे. दोन्ही कोर्सेस पुर्ण झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना माइनिंग इंजिनिअरिंग शिक्षण घेण्याकरिता ऑस्ट्रेलिया ला पाठविण्यात येणार आहे. नागपुराला पाठवित असतांना विद्यार्थ्यांचे पालक व लॉयड्स मेटल्सचे अधिकारी व कर्मचार्यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना एटापल्ली वरुन नागपुर करिता रवाना करण्यात आले.

गडचिरोली से ज्ञानेंद्र विश्वास

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *