Spread the love

DAILY KHABAR :

ब्रम्हपुरी :
ब्रम्हपुरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मैदान ब्रम्हपुरी येथे रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरीच्या वतीने 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन महोत्सव विशेष सन्माननीय सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज, इंजी. पवनपाल दवंडे महाराज, किर्तनकार हिरालाल पेंटर, प्रा. आकाश सर, इंजी. भैय्यासाहेब रामटेके रिपब्लिक साहित्यिक, डॉ. केशिप पाटील संयोजक, डेनी शेंडे अध्यक्ष, रक्षित रामटेके सचिव व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दिनांक 08 ऑक्टोबर 2023 ला संपन्न झाला. यावेळी सत्यपाल महाराज यांनी दारू पिणाऱ्या लोकांनी स्वतःच्या पत्नीला विधवा बनवू नका, असे नम्र आवाहन केले. झाडीपट्टीचे नाट्य कलाकार हिरालाल पेंटर यांनी अंधश्रद्धा विरोधात विज्ञानवादी जादुचे प्रयोग सादर केले. प्रा. डॉ. युवराज मेश्राम जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र अंनिस यांनी अंधश्रद्धा प्रयोगावर अध्यक्षीय भाषण केले तर, प्रास्तविक रक्षित रामटेके यांनी केले, सूत्रसंचालन सतीश डांगे तर आभार सिद्धांत फुलझेले यांनी मानले.

रिपब्लिकन चळवळ आणि आजचा युवा वर्ग या सत्रात प्रा. आकाश सर यांनी उपस्थित सर्वाना रिपब्लिकन चळवळीची वाटचाल बाबतीत जागतिक पुरावे सादर करुन मार्गदर्शन केले. इंजी. भैय्यासाहेब रामटेके रिपब्लिक साहित्यिक म्हणाले, बुद्धाने लोकशाही चा अर्थ धम्म, गणतंत्र चा अर्थ प्रबुद्ध, प्रबुद्ध भारतात राहणारा बौद्ध, रिपब्लिक इंडिया चा नागरिक रिपब्लिकन, अर्थात बौद्ध म्हणजे रिपब्लिकन असा अर्थ तथागत गौतम बुद्धाने सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950 ला प्रबुद्ध भारत बौद्धमय केला असे परखड मत व्यक्त केले. बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या विचाराची मदत इंडिया आघाडी घेत आहे, असे इंजी. भैय्यासाहेब रामटेके, रिपब्लिक साहित्यिक चंद्रपूर असे बोलले. यानंतर रिपब्लिकन सेनानींचा सत्कार किर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सत्यपाल महाराज, मरणोत्तर अवयवदान करणारे रक्षित रामटेके व देहदान करणारे दाम्पत्य चांदणी पाटील व डॉ. केशिप पाटील यांचा सम्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. केशिप पाटील संयोजक रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरी यांनी केले तर डेनी शेंडे अध्यक्ष रिपब्लिकन युथ फेडरेशन यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन युथ फेडरेशन ब्रम्हपुरीच्या डॉ. केशिप पाटील संयोजक, डेनी शेंडे अध्यक्ष, रक्षित रामटेके सचिव, सिद्धांत फुलझेले कोषाध्यक्ष, मनोज धनविज प्रसिद्धी प्रमुख, अमोल रंगारी, अक्षय भैसारे उपाध्यक्ष, गणेश डांगे, अश्वदिप ठवरे सहसचिव, दिलीप शेंडे, स्वप्नील उके सहसंयोजक, दामोधर बनकर, विहार मेश्राम, अमोल सरजारे, वेदांत धोंगडे, शुभम गेडाम, तेजस मेश्राम, कैलास धोंगडे, रोहित शेंडे, हिरा सोन्दरकर, ज्ञानेश नागोसे, प्रणय लोखंडे, अमित सरजारे, शैलेश लिंगायत, उमेश पिल्लेवान, संघर्ष शेंडे, सुशांत मेश्राम, चांदणी पाटील, आकांक्षा गेडाम, सुकेशनी बनकर, प्रज्ञा मंडपे, ख़ुशी मंडपे आदींनी अथक परिश्रम घेतले.

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *