Daily Khabar : 19 Oct 2023
राजुरा : सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवात गरब्याची धूम सुरू आहे.निवडणुका लागेल या उद्देशाने अनेक नेत्यांनी गरबा आयोजित करत एकेमकांची स्पर्धा दाखविण्याचा विडा उचलला आहे.परंतु सर्व गरबा महोत्सव मध्ये धुंद असताना राजुरा विधानसभेतील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता श्री. सूरज ठाकरे यांनी जनतेच्या हिताच्या अनेक मागण्या हाती घेत आमरण उपोषणाच हत्यार हाती घेत बेजबाबदार आजी – माजी आमदाराला धडा शिकविण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांना नवरात्रात तरी सद्बुद्धी यावं या उद्देशाने आमरण उपोषणाला तहसील कार्यालय समोर सुरावात केली आहे.या उपोषणाला पहिल्याच दिवशी युवा विकास मंच चे अध्यक्ष आदित्य भाके यांनी उपोषणाला स्वतः बसून पाठींबा जाहीर केला आहे.
1)राजुरा तालुक्यातील वरुर् रोड येथील जुगार क्लब बंद करण्यात यावा.
२)राजुरा शहरातील अनीधिकृत बॅनर काढण्यात यावे.
३)राजुरा तालुक्यातील निराधारांचे थकीत पैसे त्वरित शासनाने जमा करावे.
४)राजुरा तालुक्यातील अवैध्य व्यवसायावर कारवाई करण्यात यावी.
५)राजुरा तालुक्यातील अवैध्य मुरूम उत्खणाची चौकशी करण्यात यावी.
तसेच सूरज ठाकरे यांच्या जनहिताच्या मागण्या पूर्ण होत पर्यंत आमरण उपोषण करत पाठिंबा जाहीर करत असल्याचे आदित्य भाके यांनी जाहीर केले.तसेच या उपोषणाला प्रकाश खडसे यांनी पाठिंबा देत उपोषणाला सुरवात केली आणि अनेक संघटनांनी पत्र देत उपोषणाला पाठिंबा जाहीर केला.