राजुरा ÷ नेहमीच नागरिकांनी गजबजलेल्या वर्दळीचे ठिकाण म्हटले की पटकन नाका नं.तीन व आठवडी बाजार हा परिसर सांगण्यात येते एकतर वर्दळीचे ठिकाण विशेष म्हणजे शहरातुन जाणाऱ्या महामार्ग मुख्य महामार्गावर असणारे वाईन शॉपी व देशी दारूचे दुकानें येणाऱ्या ग्राहकांना व वाहनांना पार्किंग व्यवस्था नाही आणि मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरात नागरिकांची गर्दी वाढल्याने अपघाताची मोठीं शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाईन शॉपी व देशी दारूचे दुकानें स्थलांतर करा अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे,
शहरातुन गडचांदुर व तेलंगणा राज्यांकडे जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आहे या मार्गावरुन परराज्यातुन मोठी वाहतूक सुरू असते तसेच सिमेंट प्रकल्प व कोळसा खाणी असल्याने वाहनांची मोठी वर्दळ पाहायला मिळते सोबतच याचं मार्गाने प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांची ये जा सुरु असते तसेच मुख्य बाजारपेठ असल्याने परिसरात नागरिकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते दरम्यान या दोन्हीं मुख्य महामार्गात देशी दारूचे व वाईन शॉपी आहेत त्यामुळे दारु खरेदी करण्याची मोठी भर पडली आहे दारुचे दुकान रस्त्यालगत असल्याने पार्किंग अभावी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उभी असतात त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे तसेच भर रत्यावर दारुची दुकाने असल्याने महिलांना तसेच शालेय विद्यार्थ्यांचा एसटी बस थांबा असल्याने शालेय विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे याअगोदर परिसरात मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता ही दुकाने रस्त्यावरुन इतरत्र थालांतर करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे
————-+-+++–++++बाॅव्स ——————-+–+—+-+
विशेष म्हणजे शहरातील २५ टक्केपेक्षा जास्त महिलांनी मुख्य महामार्गावर तसेच रहदारी व पार्किंग व्यवस्था नसलेल्या वाईन शॉपी व देशी दारूचे दुकानें स्थलांतर करण्यासाठी मनसे तालुकाध्यक्ष आदित्य भाके यांच्या मागणीला पाठिंबा दिला असल्याचे दिसून येत आहे याअगोदर सुध्दा काही परवानाधारकांना महिलेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे आदित्य भाके यांनी परिसरातील महिलांना एकजुट करण्यासाठी मोर्चाबांधनीला सूरुवात केली असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे समोर संभाव्य काळांत यासंदर्भात मोठी चळवळ उभी राहिल असा अंदाज वर्तविण्यात येत असुन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे