
Daily Khabar :
गडचिरोली: राज्याचे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, राज्याचे उपुख्यमंत्री असताना आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली सारख्या मागास आणि दुर्गम जिल्ह्याचे पालकत्व स्वताहून स्वीकारले, मात्र आता विविध समस्यांनी जिल्ह्यातील जनता, महीला, विद्यार्थी युवक त्रस्त आहे, फडणवीस यांच्या कडे ऊर्जा खाते असताना देखील शेतीला नियमित वीज पुरवठा मिळत नाही, रानटी हत्ती आणि वाघाच्या धुमाकुळीमुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त आहे, प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याचे मालक असल्या प्रमाणे वागत आहे, मात्र पालकमंत्री फडणवीस यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असून मागील अनेक महिन्या पासुन फडणवीस यांनी जिल्ह्यात दौरा केलेला नाही, अश्या निद्रावस्थेत असलेल्या पालकमंत्र्याला जागे करण्याकरीता काही दिवसाआधी गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पत्र लिहून पालकमंत्र्यांनी किमान जिल्ह्यात दिवाळीच्या फरडा करीता तरी यावे असे निमंत्रण दिले होते. मात्र पालकमंत्र्याच्या दौऱ्याची अजूनही काही चाहूल न लागल्याने परत गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने ” पालकमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्यात परत या – जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा दया ” म्हणत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकात डफरी बजाव आंदोलन करण्यात आले.


यावेळी प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, जि.प. माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जि.प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, शहर अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलंद खोब्रागडे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, भैय्याजी कत्रौजवार, बंडोपंत चिटमलवार, गिरीधर तीतराम, सुभाष धाईत, सुरेश भांडेकर, ढिवरू मेश्राम देवाजी नैताम, सुदर्शन उंदीरवाडे, मोरेश्वर मांडाळे, लालाजी बावणे, आनंदराव खोब्रागडे, दिवाकर दुर्गे, परशुराम गेडाम, विठ्ठल लाटीवार, प्रफुल किन्नाके, हरिश्चंद्र हिवरकर, नरेंद्र खोब्रागडे, उत्तम ठाकरे, योगेंद्र झंजाळ, लालाजी सातपुते, श्रीकांत काथोटे, चोखाजी भांडेकर, शालिक पत्रे, निखिल खोब्रागडे, नामदेव आत्राम, गोपाल कविराज, गजेंद्र बिश्वास, संदीप भैसारे, देवेंद्र बांबोळे, आय बी शेख, कुंदन झाडें, श्रीरंग कोराम, हरिश्चंद्र हिवरकर, रोशन कोहळे, जावेद खान सह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गडचिरोली से ब्यूरो चीफ ज्ञानेंद्र विश्वास