
Daily Khabar :
सास्ती वाढीव प्रकल्प वेकोलीच्या प्रकल्पग्रस्थाना मागील 8 ते 10 महिन्यापूर्वी मोबदला मिळाला असून अजूनही उमेदवारांना रोजगार मिळाला नाही. शिवसेना तथा एच एम एस युनियन नेते नेते बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात हा लढा यशस्वी झाला असताना नागरिकांना रोजगार न मिळाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परंतु याच मागणीला धरून प्रकल्पग्रस्थानी बबन उरकुडे यांच्याशी संपर्क करून आज वेकोली उपविभागीय कार्यालय बल्लारपूर येथे बैठक आयोजित करून आपली मागणी रेठून धरली. आणि येणाऱ्या 15 दिवसाच्या आत रोजगार प्रक्रियेस सुरवात न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी मुख्य महाप्रबंधक डे सर, वेकोली बल्लारपूर विभागीय व्यवस्थापक रामानुजम सर, विभागीय प्लॅनिंग मॅनेजर चक्रव्रती सर, जी एम ओप्राशनल जनरल मॅनेजर ठाकरे सर यांनी बैठकीला संबोधित करत संबंधित मागणीसाठी पाठपुरावा करून त्वरित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सुभाष रमगिरवार, संतोष लांडे, अतुल चाहरे, सचिन लांडे, वैभव लांडे. प्रज्योत चिडे. शुभम परसुटकर. मंगेश खणके. देविदास वांढरे. मोतीराम चोथले. तन्मय लांडे. मंगेश काळे. शरद लांडे. हर्शल बल्की. सुनील देवालकर. चेतन गाडवे.समस्त प्रकल्प ग्रस्त माथरा. गोवरी. सास्ती.मधील शेतकरी उपस्थीत होते