Daily Khabar :
विरूर : विरूर स्टेशन येथील जिल्हा परिषद तेलुगू शाळेतील शिक्षकांच्या मागण्यांबाबत शाऴा व्यवस्थापन समिती व पालकांनी गट शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
जिल्हा परिषदेच्या विरूर केंद्रात एकमेव तेलुगू भाषेची शाळा आहे. 2 वर्षांपूर्वी या शाळेत केवळ दोनच विद्यार्थी होते.मात्र ग्रामस्थांच्या प्रयत्नाने पालकांनी इंग्रजी कॉन्व्हेंट शाऴेतील आपल्या मुलानां जिल्हा परिषदेच्या तेलुगू शाळेत प्रवेश मिळवून दिला.
त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी संख्या आता 2 वरून 85 च्या जवळ पास आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून काढून सरकारी शाळांमध्ये प्रवेश मिळूनही शिक्षकांची कमतरता शासनाच्या उणिवा अधोरेखित करते. मात्र एक वर्ष उलटून गेले तरी शाळेत 2 शिक्षकांची कमतरता आहे. या संदर्भात पालकांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. मात्र महिना उलटला तरी शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. एकीकडे शासन बेटी पढाओ, बेटी बचाव अभियान राबवत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र शाळेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करित आहेत! त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. गट शिक्षण अधिकारी श्री गौरकर यानां 4 दिवसांत रिक्त 2 शिक्षक शाळेत नियुक्ती करण्यात येणार असल्याचे ग्वाही दिली. शिक्षक नियुक्त न झाल्यास शाळेला कुलुपबंद करून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शाऴा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनुसिंग टांक सह पालक जगतसिंग वधावन,ललितकुमार सोनी यानीं दिला आहे.