राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या पाठपुराव्यास यश

Daily Khabar : दि. 18 सप्टेंबर 2024
गडचिरोली:- वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसुर येथील कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संगठन (असो.) चे प्रदेशाध्यक्ष यांच्या पुढाकाराने पाठपुरावा करण्यात आला होता
माहितीनुसार वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील चार वन कर्मचाऱ्याना रस्ता बांधकामामध्ये रस्त्याच्या कडेला ठेकेदार द्वारे नाली खोदकाम केल्यामुळे वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. सदर कामाचे वनगुन्हा दाखल करण्यात आला होता.संपूर्ण महाराष्ट्रात एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो.देश स्वतंत्र होऊन सुद्धा गावाला जाण्याकरिता रस्ते नाही.सदर गावे हे मुलभूत सोयी-सुविधेपासून वंचित आहेत. रस्त्याच्या विकासकामाकरिता कर्मचाऱ्याचे निलंबन करणे हि कार्यवाही योग्य नाही.
सदर कार्यवाही हि मानवाधिकार चे हनन आहे.जर विकासकामामध्ये कर्मचाऱ्याना निलंबन करणे म्हणजे कर्मचाऱ्याचे मानसिक संतुलन बिघडवणे खच्चीकरण करणे होय. या वन कर्मचाऱ्यांना पूर्ववत नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. कामामध्ये कर्मचाऱ्याचे निलंबन करणे सदर बाब हि अन्यायकारक असून मानवाधीकार संघटना अश्या कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय सहन करणार नाही.याची दक्षता घेऊन सदर निलंबन तातडीने रद्द करण्यात यावे वन कर्मचाऱ्याचे निलंबन रद् यावे अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मंत्री राज्याचे मत्स्य व वने सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार ,राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम, माजी खासदार अशोक भाऊ नेते व इतर मान्यवर यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता या पाठपुराव्याची दखल घेऊन राज्य सरकारने सदर चारही वनकर्मचाऱ्यांचे निलंबन राज्य सरकारने नुकताच रद्द केले याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्यातील वन कर्मचारी यांच्यामध्ये आनंद व्यक्त केले जात आहे व सर्वत्र राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे


याबद्दल राष्ट्रीय मानवधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली , जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना दहाडे ,पुरुषोत्तम गोबाडे देवानंद पाटील खुणे, कृष्णा भाऊ वाघाडे ,महिला आघाडी अध्यक्ष मनिषा ताई मडावी, लक्ष्मी कन्नाके ,तेजस्विनी भजे, मनीषा आत्राम, शितल चीकराम, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, स्वप्निल भाऊ मडावी , सुरज हजारे व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मानवाधिकार संघटनेचे आभार मानले
जिला प्रतिनिधि, ज्ञानेंद्र बिस्वास