
राजुरा : पशुसंवर्धन विभागाकडून सन 1999 पासुन दर पाच वर्षानी पशुगणना केली जाते. नोव्हेबर 2024 ते फेब्रुवारी 2025 हा कालावधी 21 व्या पशुगणनेचा आहे. सदर पशुगणनेत एकुण 16 पशुधन प्रजाती व कुक्कुट / कुक्कुटादी पक्ष्यांची गणना करण्यांत येणार आहे.
भटकी कुत्रे, भटक्या गाई तसेच या पशुगणनेत प्रथमतः भटके पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कमुनिटी) यांची देखील गणना करण्यांत येणार आहे. तालुका स्तरावर तालुकास्तरीय समन्वय व सनियंत्रण समिती स्थापन करण्यांत आली असुन तहसिलदार राजुरा समिती अध्यक्ष, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती राजुरा, हे सदस्य सचिव, मुख्याधिकारी नगर परिषद, राजुरा, प्रभारी अधिकारी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालुका पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय राजुरा, गट विकास अधिकारी पंचायत समिती, राजुरा या समितीचे देखरेखेखाली शहरी विभागात 3 व ग्रामीण भागाकरीता 18 असे एकुण 21 प्रगणक पशुगणनेचे कार्य पार पाडणार आहेत.
पशुगणनेचे कार्य प्रत्यक्षात घरोघरी जावून प्रगणकांना मार्गदर्शन करतांना तालुक्यातील नागरीकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्यांबाबत श्री. ओमप्रकाश गोंड, तहसिलदार, डॉ. सुचिता धांडे,सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन तालपसचि, राजुरा तसेच डॉ. कार्तीक कांगटे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, राजुरा यांनी कळविले आहे.