Monday, August 2, 2021
spot_img
HomeMain-sliderBHR प्रकरण संशयीतांना अटी शर्तीवर जामीन मंजूर,

BHR प्रकरण संशयीतांना अटी शर्तीवर जामीन मंजूर,

पुणे / बीएचआर घोटाळ्यात गेल्या महिन्यात जळगाव व जामनेरसह अन्य ठिकाणाहून ख्यातनाम व्यावसायिक भागवत भंगाळे,उद्योजक प्रेम कोगटा,जयश्री मणियार,संजय तोतला,जितेंद्र पाटील,छगन झालटे,आसिफ मुन्ना तेली जयश्री तोतला,प्रितेश जैन,अंबादास मानकापे आदींना अटक केली होती होती.

मंगळवारी संशयीतांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बुधवारीसर्व संशयितांच्या जामीनावर पुणे येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.प्रत्येक संशयीताने आपल्याकडे पावत्या मॅच केल्याच्या रकमेच्या 20 टक्के रक्कम ही दहा दिवसांच्या आत भरावयाची असून प्रत्येकाला एक लाख रूपयांचा जातमुचलका भरावा लागणार आहे.

पसार सुनील झंवरचा कसून शोध दुसरीकडे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तथा बीएचआरचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्याकडून मात्र आर्थिक गुन्हा शाखेला चौकशीत महत्वाची माहिती मिळाली असून या अनुषंगाने पुढील तपास होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरा मुख्य सूत्रधार सुनील झंवर हा अद्यापही पोलिसांना आढळून आलेला नाही.

प्रदीप देशमुख भुसावळ

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love