Sunday, August 1, 2021
spot_img
HomeEducationCET परीक्षा;अर्ज भरण्यासाठी सोमवार पासून सुरुआत,

CET परीक्षा;अर्ज भरण्यासाठी सोमवार पासून सुरुआत,

१० वीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.परंतु ११ वी च्या प्रवेशासाठी CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.त्याप्रमाणे आता विद्यार्थ्यांना CET परीक्षा कधी आहे याबाबत उत्सुकता लागली आहे.

१० वीच्या निकालानंतर आता ११ वीच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी CET परीक्षा घेण्यात येणार आहेत.यासाठी सोमवार पासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत.दोन दिवसांत CET परीक्षेचे वेळापत्रक आणि नियमावली जाहीर केली जाणार आहे.सदर परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने CET परीक्षेसाठी स्वतंत्र पोर्टल देखील तयार केले आहे.

CET साठी वेगळा अभ्यासक्रम असणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र ही सीईटी न देताही ११ वीचे प्रवेश घेता येणार आहेत.११ वी प्रवेशासाठी असलेल्या CET परीक्षेत मराठी विषयाला डावलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.अंग्रेजी, गणित,समाजशास्त्र,विज्ञान विषयांचा परीक्षेत समावेश करण्यात आला आहे.

प्रतिनिधि प्रदीप देशमुख / जिल्हा जळगाव

Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments

Spread the love