गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभुवैद्यनाथाला अलंकारिक पूजेने सजवले होते

0
121
Spread the love

बीड – परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले परळीतल्या प्रभु वैद्यनाथाच्या मंदिरात आज अलंकारिक महापूजेची आरास मांडण्यात आलेली आहे. नववर्षाच्या प्रथमदिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रभुवैद्यनाथाला अलंकारिक पूजेने सजवले होते.

वार्षिक उत्सवामधील ही पहिलीच पूजा असल्याने ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदीरात गर्दी केली होती.गुढीपाडव्यानिमित्त प्रभू वैद्यनाथाला दागिन्यांची सजावट करण्यात आली आहे.या अलंकारीक पूजेच्या रूपाने नेत्र दीपवून जात आहेत.श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट कडून वर्षभरात गुढीपाडवा, विजयादशमी, मकरसंक्रांती,महाशिवरात्री या सणांच्या दिवशी दर वर्षी अलंकारिक महापूजेची आरास केली होती.

( मराठवाडा ब्युरो चीफ :खदीरबापू विटेकर )

Umesh Solanki

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here