Home Feature पूर्नेतील चालक मालक संघटनेतर्फे कदम कुटुंबास मदतीचा हात

पूर्नेतील चालक मालक संघटनेतर्फे कदम कुटुंबास मदतीचा हात

0
पूर्नेतील चालक मालक संघटनेतर्फे कदम कुटुंबास मदतीचा हात

पूर्णा प्रतिनिधी
दुर्दैवी अपघातात आपला जीव गमावावा लागलेल्या चालक भीमाशंकर कदम रा. देगाव ता पूर्णा यांच्या दोन मुलींच्या नावाने सुकन्या समृध्दी योजनेत प्रतेकी 55,000रुपये जमा करून चालक आणि मालक संघटनेने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान चालक भीमाशंकर कदम यांचे आडगाव ता वसमत येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात जागीच निधन झाले, यानंतर त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलींच्या भविष्यासाठी काहीतरी करावे असा विचार चालक मालक संघटनेने एका बैठकीत मांडण्यात आला, त्यावर सर्व सदस्यांनी वर्गणी करून प्रेतेकाने आपापल्या परीने प्रयत्न करीत सुमारे 55,000रुपये कु. सिध्दी भीमाशंकर कदम आणि 55,000रुपये कू. रिद्धी भीमाशंकर कदम यांच्या नावाने पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृध्दी योजनेत गुंतवणूक करण्यास आली आहे, सदर मानवतावादी कार्यामुळे पूर्णेच्या चालक मालक संघटनेचे परिसरातून कौतुक होते आहे.

पूर्णा, परभणी महाराष्ट्र
केदार पाथरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here