राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,राजुरा नगराचा वर्ष प्रतिपदा उत्सव आज दी.२६/०३/२३ ला मुख्य संघस्थान गढी वॉर्ड राजुरा येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात मा.तालुकासंघचालक श्री.राजेंद्रजी येनुगवार यांनी तालुका आणि नगराच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा केली.
या उत्सवाला वक्ता म्हणून श्री बाळकृष्ण गोंदे उपाख्य बाळूमामा विभाग संयोजक धर्म जागरण बल्लारपूर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या वेळी प्रमुख वक्ते यांनी संघ कार्याचे महत्त्व आणि हिंदू समाज एकत्र येण्यासाठी आणि कार्याचे महत्त्व पाटवून दिले,

श्री. शैलेशजी पर्वते मा.जिल्हा कार्यवाह रा. स्व.संघ चंद्रपूर. आणि नगर कार्यवाह श्री महेशजी समर्थ मंचावर उपस्थित होते.

उत्सव पूर्वी घोष वादन पूर्ण गणवेशात नगरात पथसंचलन झाले. उत्सवाला पूर्ण गणवेशात स्वयंसेवक बंधू उपस्थित होते.

वार्ताहर:-रुपेश भाकरे

Umesh Solanki

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *