Daily Khabar :

राजुरा :

राजुरा तालुक्या अंतर्गत येणारे विरूर पोलीस स्टेशन येथून आंध्रप्रदेश बॉर्डर अंदाजे 30 ते 35 किलोमीटर आहे म्हणून त्या भागातील कापूस व तनीस च्या महिन्द्रा पिकअप व बोलेरो पिकअप इत्यादी अशा वाहणांच्या सारख्या फेऱ्या होत राहतात म्हणून विरूर पोलीस स्टेशन येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी एका गैर पोलीस इसमाला सोबत घेऊन त्या गाड्याची वसुली करतात. सदर गैर इसम हा धानोरा या गावाचा रहवासी असून विरूर पोलीस स्टेशन कडे येणार्या पत्येक गाड्यांची माहिती देतो व आवश्याकता पडल्यास वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या इसमाला पोलीस खाजगी वाहणाचे वाहन चालक म्हणून सुद्धा वापरतात जर वाहतूक शाखेचे कर्मचारी कुठल्या कामात व्यस्त असल्यास त्या गैर पोलीस इसमाला वसुली साठी पाठवतात व तो इसम प्रत्येक गाडी कडून चालण च्या नावाने वसुली करतो धानोरा टी पॉईंट -सिदेश्वर जुना आर टी ओ पॉईंट – अनुर अंतर गाव पॉईंट व पोलीस स्टेशन समोर ठाणेदार च्या आदेशाने वाहतूक शाखेचे कर्मचारी व तो गैर इसम वसुली करिता रोज वेगळा दिवस निवळतात. जर ते वाहन रोज रोज येणे जाणे करत असेल तर तो इसम महिन्याचे एवढे पैसे लागते अशी मागणी करतॊ व त्याचा महिना ठरवतो एका शिपाई पिक्षा किव्वा जमादार पेक्षा त्या इसमाच्या नावाने विरुर परिसर गाड्या चालतात.
आतां शेतकरी आपला माल विकायला कोणा कोणाला पैसे देणार ही चर्चा विरूर स्टेशन ह्या परिसरात सुरु आहे व ह्या भागात बाहेरून येणारे जाणारे माल वाहक गाडयाचे वाहन चालक चर्चा करतांना आदळून आले की आमचे खर्चाचे पैसे तर हे पोलिसेच खाऊन टाकतात तर यावर उच्छ अधिकार्यानी लक्ष द्यावे अशी चालकांची चर्चा दिसुन आली.

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *