माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दिला मदतीचा हात.!

Daily Khabar :

सिरोंचा:- शहरातील प्रभाग क्र. 05 येथील रहिवासी नावी समाजाचे श्री.नागुल रामुलू दागम अनेक दिवसांपासून कॅन्सर या रोगाने ग्रस्त होते.अनेक महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होता.कॅन्सर या रोगामुळे श्री.नागुल रामुलू दागम यांच्या शरीरा सोबत संपूर्ण कुटूंब आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत गेलं.आणि काही दिवसांपूर्वी त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबात आई,पत्नी आणि दोन मुले असा बराच मोठा कुटूंब आहे.आज त्यांच्या कुटूंबावर आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा ? हा प्रश्न निर्माण झाला. कुटूंबाचा कर्ताधरता गेल्याने त्यांच्यावर आज खूप मोठा संकट आलं.ही माहिती स्थानिक कार्यकर्ते यांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या पर्यंत पोहोचविली त्यावेळी अहेरी इस्टेटचे दानशूर राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मदतीचा हात देत आर्थिक मदत केली व आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असे आश्वासन सुध्दा दिले.यामुळे आज स्व.नागुल रामुलू दागम यांच्या कुटूंबाला आर्थिक आधार मिळाला आहे.!

त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बापन्ना रंगुवार,जिल्हा सचिव संदीप राचर्लावार,शहर अध्यक्ष दिलीप सेनिगारपू,माजी नगराध्यक्ष राजू पेद्दापल्ली,तालुका महामंत्री श्रीधर आनकरी,व्यापारी आघाडी अध्यक्ष रवी चकिनारपू हे उपस्थित होते.!

गडचिरौली से ज्ञानेंद्र विश्वास

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *