Spread the love

Daily Khabar :

गडचिरोली येथील एटापल्ली सुर्जागड येथील नदी नाले लालच लाल रंगाचे झाले असून नदी नाले दूषित झाले आहे. गोर गरीब जनतेचे गुरे डोरे या दूषित पाणी पिऊन आजारी पडत असल्याची ओरड होत आहे. पावसाच्या पाण्यात सुर्जागड लगत असलेले नदी नाले हे सुर्जागड पहाडी वरून येणारा लाल रंगाचा पाणी लोह मिश्रीत असल्याने गुरे डोरे जर हे पाणी पिल्यास मृत्यू पावल्या शिवाय राहणार नाही. सरकार मात्र या दूषित पाण्याची विलेवाट लावायला पाहिजे मात्र असे न करता नाल्या नदी मध्ये हे दूषित पाणी जाऊ देत आहे. हेच पाणी गावातील जनता सुद्धा पीत असेल तर किडनी. लिव्हर. कॅन्सर सारखे आजार होऊ शकतो यात काही दुमत नाही. रोड वर चालणाऱ्या अवजड वाहना मुळे पूर्ण रस्ते लाल झाले असून आजू बाजूला असलेले मूल्यवान सागवान चे व इतर झाडें सुद्धा काही दिवसात नामसेस होण्यास वेळ लागणार नाही करिता मानवाधिकार संघटने चे राष्ट्रीय प्रवक्ते ज्ञानेद्र बिस्वास यांनी मागणी केली आहे की दूषित पाणी हे नदी नाल्यात न जाऊदेता या दूषित पाण्याचा व्हिलेवाट लावावे व मणूस्य जीव व प्राण्याचा जीव वाचवावा अशी मागणी केली जात आहे.

जिला प्रतिनिधि ज्ञानेंद्र बिस्वास

संजय रामटेके ( सह संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed