Spread the love

पूर्णा दि.१५ मार्च /केदार पाथरकर
व्यसनामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे.२५ वर्षाच्या मुलाला बाप अग्नी देतोय हे दुर्दैव पाहायला मिळते. तरुणांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका असा सल्ला प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिला.

शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम (उद्धव बाळासाहेब ठाकरे)यांच्या वाढदिसानिमित्त हभप इंदुरिकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम,विशाल कदम,आयोजक सचिन उर्फ पप्पू कदम यांनी निवृत्ती महाराज यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
जुना मोंढा येथील मैदान हे पूर्णपणे भाविकांनी खचाखच भरले होते.त्यांनी माऊली ज्ञानेश्वरांच्या अभंगावर प्रबोधनात्मक कीर्तन केले. यावेळी हरिपाठाचे महत्व सांगताना हरिपाठ हे सर्व ग्रंथाचा सार आसल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवसनिमित्त विशाल कदम यांनी आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्या बद्दल त्यांचे कौतुक केले.कीर्तनास तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात हजर होते.

Umesh Solanki

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed